Skip to Content

Bavistin या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण माहिती

2 November 2025 by
Vitthal Gadakh
| No comments yet

Bavistin हे बुरशीनाशक Broad-spectrum systemic fungicide" या गटातील आहे याचा मराठीत अर्थ आहे "विस्तृत-गटातील आंतरप्रवाही बुरशीनाशक". म्हणजे हे एक असे बुरशीनाशक आहे जे अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवते आणि ते वनस्पतीच्या आत शोषले जाऊन पसरते. 

आंतरप्रवाही (Systemic): हे बुरशीनाशक वनस्पतीच्या आत शोषले जाते आणि झाडाच्या ऊतींमध्ये पसरते, ज्यामुळे ते रोगावर नियंत्रण ठेवते आणि प्रतिबंध करते.

Bavistin हे अनधान्य पिके,फळपिके आणि भाजीपाला पिके या सर्वामध्ये प्रभावीपणे बुरशी नियंत्रण करते.

Bavistin मध्ये Carbendazim 50% WP हा घटक असतो.

Bavistin हे बुरशीनाशक प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक (Preventive and Curative action) म्हणून वापरता येते.

 काही प्रमुख पिकावरील रोग व त्यासाठी बाविस्टीन चा वापर

पिक

रोग

डोस

धान / तांदूळ

करपा (Blast)

१००-२०० ग्राम प्रती एकर

धान / तांदूळ

Sheath Blight

२ ग्राम प्रती किलो बियाणे

गहू

काणी (Loose Smut)

२ ग्राम प्रती किलो बियाणे

कपाशी

पानावरील डाग (Leaf Spot )

१०० ग्राम प्रती एकर

भुईमुग

टिक्का

९० ग्राम प्रती एकर

काकडीवर्गीय पिके

भुरी ( Powdery Mildew)

१२० ग्राम प्रती एकर

वांगी

फळ सड , Leaf Spot

१२० ग्राम प्रती एकर

द्राक्ष

ॲन्थ्रॅक्नोज

१२० ग्राम प्रती एकर

 


Bavistin या बुराशिनाशका सारखे घटक असणारे इतर बुरशीनाशक

व्यापारी नाव

कंपनी

घटक

YAMATO

IFFCO

Carbendazim 50%WP

Dhanustin

Dhanuka

Carbendazim 50%WP

Benfil

Indofil

Carbendazim 50%WP

Captain

Vulture

Carbendazim 50%WP

ZEN

Nagarjuna

Carbendazim 50%WP

Share this post
Sign in to leave a comment