खरीप पीक काढणीनंतर सर्व शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात करत आहेत. महाराष्ट्र राज्यात बरेच शेतकरी हरभरा पीक पेरणी करतात पण सध्या अनेक ठिकाणी पाऊस आल्यामुळे शेतकरी संभ्रमात पडलेत कि हरभरा पीक पेरणी करावी कि नाही? आणि या पावसाच्या वेळी पेरणी करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ.
पेरणीपूर्वी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदेही झालेले आहेत कारण पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा राहील त्याचसोबत जमिनीची मशागत करणे सोपे झाले. पण या पावसाचे काही दुष्परिणाम पण आहेत. जे तुमच्या हरभरा पिकावर मोठे नुकसान करतात.
पावसामुळे होणारे दुष्परिणाम
- पावसामुळे जमिनीत जास्त ओलावा राहतो या परिस्थितीत पेरणी केल्यास पेरलेले बियाणे सडते किंवा ऑक्सिजन नसल्यास बियाणे उगवत नाही.
- पावसानंतर कडक ऊन पडल्यास जमीन कडक होते त्यामुळे मशागत करावी लागू शकते.
- पावसामुळे अनेक रोग होण्याच्या संभावना वाढतात. महत्वाचे म्हणजे मर रोगास वाढ होऊन अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
- पावसामुळे सुरुवातीच्या काळात तण वाढते त्यामुळे पोषकतत्वांसाठी स्पर्धा वाढते.
- घाटेअळी व कटवर्म सारख्या कीटकांचाही धोका वाढतो.
- पाऊस सारखा येत असल्यास पेरणीला उशीर होतो.
पेरणीच्या अगोदर घेण्याची काळजी
- पावसानंतर लगेच पेरणी करणे टाळावे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यावर पेरणी करावी.
- जमीन कडक झाल्यास मशागत करावी यामुळे उगवण योग्य होते.
- पेरणी अगोदर बीजप्रक्रिया योग्यरीत्या केल्यास मररोग, मूळकूज किंवा बियाणे सडणे ह्यासारखे ठोके टळतात.
- पेरणी करताना बियाणे कमी खोलीवर (4 ते 5 सेंमी) टाकावे. यामुळे बियाणे सडणे किंवा उशिरा उगने टळते.
या संपूर्ण गोष्टींची काळजी घेतल्यास निरोगी व अधिक उत्पादन हरभरा पीक होईल. पेरणी करतांना काळजी घ्या व लगेच पेरणी करणे टाळा. योग्य काळजी घेतल्यास होणारे नुकसान टळू शकते.
हरभरा पीक लागवड तंत्रज्ञान व मर रोग नियंत्रणाबद्दल माहिती साठी या लिंकवर जा हरभरा लागवड तंत्रज्ञान व मर रोग नियंत्रण